06/12/2016 48

आयुर्वेदिक वनस्पती व उपचार

१- पिपंळ - याला ' बोधीवृक्ष ' म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होत. हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते. याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते. २ - केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्‍यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते. ३ - हादगा - हादग्याला आपण ' अगस्ती ' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे. ४ - बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्‍यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे , तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.

READ MORE

FREE APPOINTMENT BOOKING

Book your Online Appointment for Consulting.

book your appointment